Pune Crime News | बसमधील वयोवृद्ध महिलांच्या हातामधील सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी, दोन गुन्हे उघड

पुणे : Pune Crime News | बसमधून जाणार्या वयोवृद्ध महिलांच्या हातातील सोन्याची बांगडी कापून चोरणार्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कृष्णा रमेश माने Krishna Ramesh Mane (वय ४१, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कोंढव्याकडे जाणार्या रोडवरील कात्रज बस स्टॉपवर हडपसरकडे जाणार्या बसमध्ये १९ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता ६२ वर्षाच्या महिला जात होत्या. त्यावेळी तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी चोरुन नेली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. (Bharti Vidyapeeth Police)
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे आरोपीचा शोध घेत होते. यावेळी रेकॉर्डवरील कृष्णा माने याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो कात्रज कोंढवा रोडवरील बसस्टॉपवर मिळाला. त्याला १४ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात कात्रज भागातून आणखी एका वृद्ध महिलेच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून सोन्याची पाटली बांगडी जप्त करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Arrest In Robbery Case)
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश् चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, चेत गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे यांनी केली आहे.