Yerawada Pune Crime News | लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील वाहनांची तोडफोड करणार्या गुन्हेगाराची येरवडा पोलिसांनी काढली धिंड (Video)

पुणे : Yerawada Pune Crime News | येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील १२ रिक्षा व २ मोटरसायकलची तोडफोड करणार्या गुन्हेगाराला पकडून येरवडा पोलिसांनी जेथे तोडफोड केली, त्या परिसरात धिंड काढली.
सयाजी संभाजी डोलारे Sayaji Sambhaji Dolare (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तोडफोडीची ही घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता घडली होती.
याबाबत अबूबकर रजाक पिरजाते (वय ३१, रा. लक्ष्मीननगर पोलीस चौकी शेजारी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिरजाते व इतरांच्या रिक्षा पार्क केलेल्या असताना रात्री २ वाजता सयाजी डोलारे याने परिसरात मोठ्मोठ्याने आरडा ओरडा करीत शिवीगाळ करुन दहशत माजविली. त्याच्याकडील धारदार हत्याराने परिसरातील १२ रिक्षांच्या काचा फोडल्या. २ दुचाकीवर वार करुन नुकसान केले. एक जेसीबीची काच फोडली. फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर वार करुन जखमी केले होते.
या घटनेनंतर सयाजी डोलारे हा फरार झाला होता. येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) त्याला शनिवारी अटक केली. त्यानंतर रात्री लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढली. जेथे जेथे गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविली होती. त्या परिसरात हातात दोरखंड बांधून त्याला फिरविण्यात आले.