Silent March Against Christianity In Pune | पुण्यात ख्रिश्चनिटी विरुद्ध मूकमोर्चाचे आयोजन, हातामध्ये फ्लेक्स घेऊन ख्रिश्चनिटीचा दर्शवला निषेध

पुणे : Silent March Against Christianity In Pune | सूनील तांबट आणि अविनाश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिश्चनिटी विरुद्ध मूकमोर्चाचे आयोजन पवित्र नाम देवालय,पंच हौद, (सेंट तेरेसा चर्च) गुरूवार पेठ येथे रविवार (दि.१६) रोजी करण्यात आले होते.
या मूक मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी हातामध्ये फ्लेक्स घेऊन शांतपणे ख्रिश्चनिटीचा निषेध दर्शवला. या मूक मोर्चा मध्ये सुहास साळवी, दिलीप हुडके, मयुर चाचर, किरण परदेशी, संकेत गायकवाड, कुणाल खडके, ऋग्वेद शेलार, ऋषिकेश पांडे आणि विवेक कुलकर्णी यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मूकमोर्चा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.