Fastag Rules Change | आजपासून बदलले Fastag संबंधी हे नियम, दुर्लक्ष केल्यास ब्लॅकलिस्ट होऊ शकतो फास्टॅग, आधीच जाणून घ्या सर्वकाही…

FASTag

नवी दिल्ली : Fastag Rules Change आज म्हणजे सोमवारपासून फास्टॅगसंबंधी नियम बदलणार आहेत. जर तुम्ही तुमचे फास्टॅग रिचार्ज केले नसेल अथवा इनअ‍ॅक्टिव्ह आहे, अथवा ब्लॅकलिस्ट आहे तर ते ताबडतोब रिचार्ज करून अ‍ॅक्टिव्ह करा, अन्यथा तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागू शकतात.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनद्वारे नवीन नियम आज 17 फेब्रुवारीपासून लागू होत आहे. वाहन चालकांना टोल बूथ ओलांडण्यासाठीच्या किमान 60 मिनिट आधी अथवा टोल ओलांडण्याच्या 10 मिनिटापर्यंत फास्टॅग रिचार्ज करावे लागेल. जर असे केले नाही तर दुप्पट टोल भरावा लागेल.

टोल बूथवर कमी होईल गर्दी

टोल बूथवर गर्दी कमी व्हावी आणि टोल टॅक्ससंबंधी नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने नियम सोपे केले आहेत, ज्यांचे आता सक्तीने पालन केले जाईल.

केव्हा ब्लॅकलिस्ट होईल फास्टॅग अकाऊंट

  • जर वाहन चालकाने आपल्या फास्टॅग खात्यात रिचार्ज केले नाही.
  • परिवहन विभागात कोणत्याही प्रकारचे प्रकरण असेल.
  • अकाऊंटमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशावेळी फास्टॅग अकाऊंट ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते.