Temperature Hike On Valentines Day In Pune | ‘हॉट व्हॅलेंटाईन डे’! पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाका वाढणार, पारा 37 अंशांवर जाण्याची शक्यता, तरूणांनो सेलिब्रेशन करताना काळजी घ्या

पुणे : Temperature Hike On Valentines Day In Pune | सध्या उन्हाचा तडाका वाढत चालल्याचे दिसत आहे. विशेषता पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके बसताना दिसत आहेत, मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील आहेत. वातावरणात झालेल्या या बदलांचा आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. आज 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ असून तरूणाई या दिवशी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून दिवस एन्जॉय करत असते. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. कारण, उन्हाचा पारा 37 अंशावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील तापमानात बहुतांश वाढ झाली आहे. सोलापूर आणि सांगलीमधील तापमानाचा पारा वाढला आहे. इतरही शहरांच्या तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे पिकांची आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊया. आज पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. पुण्यात मुख्यतः आकाश निरभ्र असेल.
आज सातार्यात देखील आकाश निरभ्र राहिल, कमाल तापमान 34 अंश तर किमान 17 अंश सेल्सिअस राहू शकते. तर कोल्हापूरमध्ये आज मुख्यतः आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर मधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील.
सांगलीमधील कमाल तापमानात वाढ झाली असून आज येथे मुख्यतः आकाश निरभ्र राहू शकते. नागरिकांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील.
सोलापूरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमधील कमाल तापमानात बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत सोलापूरमधील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने उकाडा वाढणार आहे.