Pune Crime Branch News | पुणे : मोक्यातील गुन्ह्यात जामीनावर असलेल्या गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

पुणे : Pune Crime Branch News | शहरात राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे. (Pistol Seized)

अनिकेत गुलाब यादव Aniket Gulab Yadhav (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

शहर पोलीस दलाकडून १३ फेब्रुवारी रोजी कोबिंग ऑपरेशन आयोजित केले होते. या दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक लोणी काळभोर परिसरात गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्हेगार अनिकेत गुलाब यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.