Kolhapur Crime News | नरभक्षी ! जन्मदात्या आईची हत्या करुन अवयव शिजवून खाल्ले, काळीज शिजवून खाण्याच्या बेतात असतानाच पोलीस पोहोचले अन्…

कोल्हापूर : Kolhapur Crime News | आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचे विकृत कृत्य एका तरुणाने केले होते. २०१७ मध्ये ही घटना घडली होती. यल्लमा रामा कुचकोरवी (वय-६३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनील कुचकोरवी असे नराधम तरुणाचे नाव आहे. २८ ऑक्टोबर २०१७ या दिवशी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये सुनील कुचकोरवीला फाशीची शिक्षा सुनाववली होती. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. “आरोपीची तुलना कसायाशीही करता येऊ शकणार नाही, हे नरभक्षणाचे प्रकरण आहे”, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. (Son Kill Mother)
यल्लम्मा या कंगवा, पिना विकून घर चालवत होत्या. यल्लमाच्या मुलगा सुनील हा काहीच कामधंदा करत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. मुलाची दारू सुटावी म्हणून यल्लमा त्याला सतत ओरडायची. मात्र, त्याच्यावर याचा काहीच फरक पडला नाही. २८ ऑगस्टच्या दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
भांडणादरम्यान सुनीलने जन्मदाती आईचा धारदार चाकूने खून केला. इतकंच नव्हे तर त्याने आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला. नंतर आईची किडनी, लिव्हर इतर अवयव बाजूला केले. त्यानंतर ते अवयव शिजवून खाल्ले. शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. आरोपी सुनील तेव्हा आईचे काळीज काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.