Kirloskar Brothers Limited | किर्लोस्कर ब्रदर्सच्या निव्वळ नफ्यामध्ये 43.8 टक्क्यांची वाढ ! तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर; महसूली उत्पन्नातही 18.6 टक्क्यांची वाढ

Kirloskar Brothers Limited

पुणे : Kirloskar Brothers Limited | पंप निर्मितीसाठी देशातील अग्रगणी समजल्या जाणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीने अर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये ४३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा आता ११८.५ कोटी रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. कंपनीच्या महसूली उत्पन्नातही १८.६ टक्क्यांची वाढ झाली असून महसूली उत्पन्न ११४४ कोटी रूपये इतके झाले आहे.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल बुधवारी जाहीर केले. यामध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये ४३.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून महसूली उत्पन्नही मोठ्याप्रमाणावर वाढले असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही वाढ १८.६% इतकी असून महसूली उत्पन्न ११४४.२ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीतव कंपनीचे महसूली उत्पन्न ९६४.८ कोटी रूपये इतके होते. तर गेल्या वर्षी कंपनीने ८२.४ कोटी इतका निव्वळ नफा केला होता. यंदा त्यात वाढ झाली असून निव्वळ नफा ११८ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

संपूर्ण नऊ महिन्यांचा विचार केला तर कंपनीच्या महसूली उत्पन्नात १५.६ टक्क्यांची वाढ झाली असून ही रक्कम ३२१०.९ कोटी इतकी झाली आहे. तर नऊ महिन्यांचा निव्वळ नफा 42.7% ने वाढून 280.9 कोटी रूपये झाला आहे,

तिसऱ्या तिमाहीचे निकाल :

• महसूली उत्पन्न १८.६% वाढून ₹११४४.२ कोटींवर
• निव्वळ नफा ४३.८% वाढून ₹११८.५ कोटींवर

नऊ महिन्यांचे निकाल :

• महसूली उत्पन्न१५.६% वाढून ₹३२१०.९ कोटींवर
• निव्वळ नफा ४२.७% वाढून ₹२८०.९ कोटींवर