Stock Market In Red Zone | आजसुद्धा सावरला नाही शेयर बाजार, घसरणारा रूपया आणि Trump यांच्या ‘टेरिफ टेरर’चा दिसून आला मोठा परिणाम

नवी दिल्ली : Stock Market In Red Zone | भारतीय शेयर बाजारात अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ टेररचा परिणाम कमी होताना दिसत नाही, यामुळे बाजार सावरताना दिसत नाही. तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणार्या रूपयाने चिंता आणखी वाढवली आहे. आठवड्याच्या दुसर्या दिवशी मंगळवारीसुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेयरचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी रेड झोनमध्ये खुले झाले आणि सुरुवातीची मंदी बघता-बघता तीव्र घसरणीमध्ये बदलली. अवघ्या तासाभराच्या व्यवहारातच सेन्सेक्सने 350 अंकापेक्षा जास्त डुबकी मारली. तर बघता बघता 100 अंकाने आणखी घसरला.
सोमवारप्रमाणेच मंगळवारीसुद्धा शेयर बाजारात मंदी दिसून येत आहे. BSE Sensex 77,384.98 च्या पातळीवर खुला झाल्यानंतर अचानक तीव्र घसरण होत तो 76,931.77 च्या पातळीवर आला. दुसरीकडे NSE Nifty ने सुद्धा 23,383.55 च्या पातळीवर सुरूवात केली आणि काही वेळातच 120 अंकापेक्षा जास्त घसरून 23,261.25 वर व्यवहार करताना दिसला. मागील व्यवहाराच्या दिवशीसुद्धा दोन्ही इन्डेक्स दिवसभर रेड झोनमध्ये व्यवहार करता-करता शेवटी घसरणीसह बंद झाले होते.
अमेरिकन राष्ट्रपती Donald Trump यांनी पदभार सांभाळताच टेरिफ वॉर सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी केलेल्या घोषणेमुळे भारतीय उद्योग जगतात सुद्धा चिंता वाढली. त्यांनी अमेरिकेत सर्व स्टील आणि अॅल्यूमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली. या सेक्टरशी संबंधीत भारतीय कंपन्यांचा सुद्धा अमेरिकेत मोठ्या व्यवसाय आहे आणि देशातून अमेरिकेत दरवर्षी अरबो डॉलरचे स्टील आणि अॅल्यूमिनियम निर्यात केले जाते. यामुळे केवळ याच सेक्टरमधील कंपन्याच नव्हे तर शेयर बाजारावरच दबाव दिसत आहेत.
मंगळवारी सर्वात जास्त घसरलेले 10 शेयर
लार्जकॅप कॅटेगरी
Zomato Share (4.56%), PowerGrid Share (2.05%), Kotak Bank Share (2%), Tata Motors Share (1.90%)
मिडकॅप कॅटेगरी
Nam-India Share (5.02%), Thermax Share (4.83%), Emami Ltd Share (4.67%) IREDA Share (4.20%)
स्मॉलकॅप कॅटेगरी
Alicon Share 16.05%, NGL Fine Share ची 13.19% घसरण झाली.