Uran Panvel Road Accident News | कामावरून घरी जाताना काळाचा घाला, भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

मुंबई : Uran Panvel Road Accident News | कामावरून दुचाकीने घरी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिजित भुवड (वय -३०) आणि अनिश नायर (वय -२६) अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दुचाकीचा हा अपघात उरण-पनवेल मार्गावर जासई उड्डाणपुलावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उरणमधील बोरी गावातील अभिजित भुवड आणि अनिश नायर तरुण कामावरून आपल्या घरी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यावेळी उरण-पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याननंतर वाहन चालक फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अपघाताप्रकरणी उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.