Pune Crime Branch News | कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेल्या तरुणाकडून पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : Pune Crime Branch News | कर्वेनगर येथील डी पी रोडवर थांबलेल्या तरुणाला पकडून त्याच्याकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कुणाल सचिन घावरे Kunal Sachin Ghawre (वय २८, रा. नानासाहेब बराटे कॉलनी, कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. (Pistol Seized)
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक वारजे माळवाडी येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की कर्वेनगरमधील डी पी रोडवर एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन एका तरुणाला ताब्यात घेतले. कुणाल घावरे याची अंगझडती घेता त्याच्याकडे ४१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन काडतुसे मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करुन त्याला ताब्यात घेतले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, भाऊसाहेब पठारे यांच्या सुचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे व रंगराव पवार, गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, हरिष गायकवाड, प्रतिक मोरे, इसाक पठाण यांनी केली आहे.