Cheating Fraud Case Pune | गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 30 लाखांची फसवणूक; कार्यालय बंद करुन संचालक फरार, इन्डेक्स ट्रेडर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Cheating Fraud Case

पुणे : Cheating Fraud Case Pune | गुंतवणुकीवर १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे स्वीकारुन एके दिवशी अचानक इन्डेक्स ट्रेडर्सचे कार्यालय बंद करुन संचालक फरार झाले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Sahakar Nagar Pune Crime News)

याबाबत थेरगाव येथील एका ५१ वर्षाच्या महिलने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आनंद बाजीराव आबनावे Anand Bajirao Abnave (वय ३५,.रा. गंगासमृद्धी, फातिमानगर, वानवडी) आणि अमित पायगुडे Amit Paigude (वय ३६, रा. पायगुडे वाडा, सिंहगड रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. हा प्रकार धनकवडीतील के के मार्केट येथील इन्डेक्स ट्रेडर्स या कार्यालयात डिसेंबर २०२२ ते १३ मे २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आबनावे व अमित पायगुडे यांनी के के मार्केट येथे इन्डेक्स ट्रेडर्स या नावाने ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय उघडले. त्यांनी लोकांना गुंतवणुकीवर १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व इतर गुंतवणुकदाराकडून आरटीजीएस द्वारे पैसे घेतले. फिर्यादी यांनी ६ लाख रुपये गुंतविले होते. फिर्यादी व इतरांचे मिळून एकूण ३० लाख ५० हजार रुपये गुंतवणुक केली. सहा महिने त्याचे कार्यालय सुरु होते. त्यानंतर मे महिन्यात त्यांनी अचानक कार्यालय बंद करुन दोघेही फरार झाले. लोकांनी त्यांना फोन केल्यावर काही दिवस ते पैसे देतो, असे आश्वासन देत होते. त्यानंतर त्यांचे फोनही बंद झाले. त्यानंतर आता लोकांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांकडे आतापर्यंत आलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी व इतर पाच जणांची मिळून ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणुक झाली आहे. आणखी काही तक्रार अर्ज आले असून फसवणुकीची ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे (PSI Reshma Salunkhe) तपास करीत आहेत.