Drink And Drive Case Pune | मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्यास दंडासह कारावासाची शिक्षा

पुणे : Drink And Drive Case Pune | मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्याविरोधात पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अशा मद्यपी चालकांमुळे इतरांच्या जीवितास धोका उत्पन्न होत असतो. न्यायालयाने अशा मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्या चालकास दंडासह कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
रबीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी) असे या चालकाचे नाव आहे. मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश बिराजदार यांनी रबीर शेख याला ५ दिवसांची साधी कैद व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
कोथरुड वाहतूक विभागाने ३ ऑगस्ट २०२४ रोजी हा खटला दाखल केला होता. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक थोपटे, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी केली आहे.
ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केसेस
वर्ष —— केसेस
२०२० —— २०१७
२०२१ —— ६९
२०२२ ——- ३७
२०२३ —— ५६२
२०२४ —— ५२९३
२०२५ —— ५९३
(५ फेब्रुवारीपर्यंत)