Significant Increase In Production | आता मध्यमवर्गीय कुटुंबियांचे किचन-बजेट बिघडवणार नाहीत कांदा, बटाटा आणि टोमॅटो, सरकारने सांगितले कारण

नवी दिल्ली : Significant Increase In Production | अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय कुटुंबियांना केंद्र सरकारने कर सलवतीचा मोठा दिलासा दिला आहे. यानंतर आता सरकारकडून आणखी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, या वर्षी कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या किचनचे बजेट बिघडवू शकणार नाहीत.
केंद्र सरकारने माहिती दिली आहे की, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या पिकाचे प्रचंड असे उत्पादन झाले आहे. ज्यामुळे यावर्षी त्यांचे दर वाढण्याची शक्यता नाही. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वात जास्त मध्यमवर्गीय त्रस्त होतात. कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या दराने मागील वर्षी लोकांना खुप त्रस्त केले होते, परंतु यावेळी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीक वर्ष जुर्ल ते जूनपर्यंत असते. या पीक वर्षात म्हणजे जून 2025 पर्यंतसाठी सरकारने अंदाज वर्तवला आहे की, कांद्याचे उत्पादन 19 टक्के वाढेल. या वाढीनंतर ते 288.77 लाख टन होऊ शकते. याचा कालावधीत मागील वर्षी 242.67 लाख टन कांद्याचे उत्पादन झाले होते.
अशाच प्रकारे बटाट्याच्या उत्पादनात सुद्धा वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार या पीक वर्षात 595.72 लाख टन बटाट्याचे उत्पादन होऊ शकते.
टोमॅटोच्या उत्पादनात सुद्धा 1.06 टक्केच्या वाढीचा अंदाज व्यक्त होत आहे. मागील वर्षी टोमॅटोचे उत्पादन 213.23 लाख टन होते, जे यावर्षी 215.49 लाख टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.