Kalepadal Pune Crime News | मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन फसवणुक करणार्‍यास इंदौरहून केले अटक ! काळेपडळ पोलिसांची कामगिरी; दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर गुन्हे दाखल

पुणे : Kalepadal Pune Crime News | मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या ठकास काळेपडळ पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदौर येथून अटक केली.

अमन प्रेमलाल वर्मा Aman Premlal Verma (वय ३८, रा. बिश्ना, जि. जम्मू काश्मिर) असे त्याचे नाव आहे. फिर्यादी तरुणीशी आरोपी अमन वर्मा याच्याशी मेट्रोमनी साईटवर ओळख झाली. त्याने लग्नाचे आश्वासन देऊन त्याच्यासोबत शारीरीक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यांच्या विश्वास संपादन करुन फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात सुमारे ४५ लाख रुपये घेतले. फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केल्याचा काळेपडळ पोलीस ठाण्यात (Kalepadal Police Station) दाखल होता. (Cheating Fraud Case)

गुन्ह्याच्या तपासात अमन वर्मा हा सराईत गुन्हेगार असून तो सोशल मीडियावर अथवा मेट्रोमनी साईटवर फेक आयडी तयार करत़ महिलांशी मैत्री व जवळीक निर्माण करुन त्यांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा हडप करत होता. त्याच्याविरुद्ध दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या गुन्ह्याच्या तपासात बातमीदाराकडून हा आरोपी इंदौर येथे असल्याची माहिती मिळाली. बातमीच्या अनुशंगाने तांत्रिक तपास करुन काळे पडळ पोलीस ठाण्याकडील तपास पथक इंदौर येथे गेले. त्यांनी अमन वर्मा याच्या शोध घेऊन त्याला अटक केली. न्यायालयाने अधिक तपासासाठी १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, पोलीस हवालदार युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले यांच्या पथकाने केली आहे.