Khadki Pune Crime News | खंडणी न दिल्याने भाजी विक्रेत्याच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; खडकीतील घटना

पुणे : Khadki Pune Crime News | भाजी विक्रेत्याने खंडणी न दिल्याने त्याची भाजी फेकून देऊन त्याच्या गळ्यावर, गालावर चाकूने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे या खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत शौकत बाबमिया (वय ३६, रा. दर्गा वसाहत, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकीतील संजय गांधी भाजी मंडईमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत बाबमिया यांचा खडकी भाजी मंडईमध्ये भाजीचा गाळा आहे. ते भाजी विकत असताना मनोज स्वामी तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे खंडणी म्हणून पैशांची मागणी केली. शौकत यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मनोज याने त्याची भाजी उचलून फेकून दिली. चाकूने त्यांच्या गळ्यावर व डाव्या गालावर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी मनोज स्वामी याला अटक केली आहे.