Finance Ministry | भारत सरकारचे सरकारी कर्मचार्‍यांसाठी फर्मान, चुकूनही करू नका ChatGPT, DeepSeek सारख्या AI टूल्सचा वापर

नवी दिल्ली : Finance Ministry | भारत सरकारने सर्व सरकारी कर्मचार्‍यांसाठी एक सक्त आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये एआय टूल्स आणि अ‍ॅप्लिकेशन वापरण्यावर प्रतिबंध लावलण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी या आदेशानुसार, चॅटजीपीटी, डीपसीक सारखे इतर एआय टूल्स ज्यांचे नियंत्रण देशाच्या बाहेर आहे, त्यांचा वापर सरकारी उपकरणांवर करता येणार नाही.

संयुक्त सचिव प्रदीप कुमार सिंह यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व सरकारी सिस्टमवर AI-आधारित अ‍ॅप्लिकेशनचा वापर केल्याने देशाच्या डेटाची सुरक्षा प्रभावित होऊ शकते. यासाठी अशा टूल्सचा वापर अधिकृत उपकरणांवर करणे टाळावा. हा आदेश सर्व सरकारी विभागांना पाठविण्यात आला आहे.

सर्व AI-आधारित अ‍ॅप्लिकेशन आणि टूल्सवर सरकारचे नियंत्रण नाही. ज्यामुळे सायबर हल्ले वाढू शकतात आणि वैयक्तिक माहितीचा बाहेर चुकीचा वापर केला जाऊ शकतो. सरकारी माहितीची गोपनियता अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

AI-आधारित अ‍ॅप्लिकेशन आणि टूल्सबाबत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ सरकारी कंपन्यांमध्येच नव्हे, तर अनेक खाजगी कंपन्यांनीसुद्धा आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अशा एआय टूल्सचा वापर करण्यावर प्रतिबंध लावला आहे. ChatGPT, DeepSeek सारख्या एआय मॉडेल्सची निर्मिती ज्या देशांमध्ये करण्यात आली आहे, तिथेच यूजर्सची माहिती संग्रहित केली जात आहे.

ते सर्व यूजर्सची माहिती एक्सटर्नल सर्व्हरवर स्टोअर करत आहेत. यासाठी डेटा लीक होणे आणि अनेक लोकांकडे अ‍ॅक्सेस पोहोचण्याचा धोका देखील वाढत आहे. यासाठी जगभरातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यानीसुद्धा अशा टूल्सच्या वापरावर निर्बंध लावले आहेत, जेणेकरून त्यांचा डेटा कोणीही चोरू शकणार नाही.