Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनी चीनचे ‘हे’ प्रसिद्ध ई-कॉमर्स अ‍ॅप भारतात पुन्हा केले लाँच, 5 वर्षापूर्वी मोदींजींनी केले होते बॅन

Mukesh-ambani

नवी दिल्ली – Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या कंपनीने चीनचे प्रसिद्ध Shein अ‍ॅप भारतात पुन्हा लाँच केले आहे. शीन अ‍ॅप चीनचे एक ई-कॉमर्स अ‍ॅप आहे, जे पूर्वी भारतात सुद्धा खुप पॉप्युलर होते. 2020 मध्ये भारत आणि चीन सीमा वादानंतर चीनचे Shein अ‍ॅप मोदी सरकारने बॅन केले होते. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने भारतात Shein अ‍ॅप पुन्हा लाँच केले आहे.

2023 मध्येच रिलायन्स रिटेलने Shein अ‍ॅपसोबत भागीदारी करून भारतात पुन्हा आणण्याची घोषणा केली होती, ज्यानंतर आता हे अ‍ॅप भारतात आले आहे. या अ‍ॅपचे पूर्ण नियंत्रण आता रिलायन्स रिटेलकडे असेल. शीन अ‍ॅपद्वारे विकले जाणारे सर्व प्रॉडक्टस भारतातच बनविले जातील. ही सर्व प्रॉडक्ट स्वस्त असतील.

Shein अ‍ॅप रिलायन्स सध्या काही निवडक शहरांमध्येच लाँच केले आहे. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. लवकरच शीन अ‍ॅप संपूर्ण भारतात लाँच केले जाईल. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलचा कारभार सध्या त्यांची मुलगी ईशा अंबानी पहात आहे.

2020 मध्ये मोदी सरकारने भारतात Shein अ‍ॅप बॅन केले होते. भारत-चीन सीमा वादाच्या प्रकारानंतर कन्झ्युमर डेटा सिक्युरिटी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोदी सरकारने काही अ‍ॅपसोबतच शीन अ‍ॅप बॅन केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही कारवाई केल्याचे म्हणत मोठे कौतुक झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी चीनला मोठा धक्का दिल्याचे म्हटले गेले होते.