Cheating Case On Dr Abhinav Khare | पुणे : थेरगावातील स्पंदन मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अभिनव खरे यांच्यावर 1 कोटी 37 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : Cheating Case On Dr Abhinav Khare | हॉस्पिटलमध्ये गुंतवणुक केल्यास पार्टनरशीप देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात पार्टनरशीप दिली नाही. तसेच स्पंदन हॉस्पिटल बंद करुन फसवणुक करणार्या डॉक्टरावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)
डॉ. अभिनव खरे (रा. स्पंदन मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, भोईर प्लाझा, डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. याबाबत बालेवाडी येथील एका ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जून २०२१ ते १८ डिसेबर २०२४ दरम्यान घडला आहे. (Thergaon Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अस्थमाचा आजार असल्याने ते डॉ. अभिनव खरे याच्याकडे उपचारासाठी जात होते. त्यातून त्यांची ओळख निर्माण झाली. फिर्यादी हे सेवानिवृत्त असल्याने त्यांच्याकडे पेन्शनची रक्कम असल्याची डॉ.अभिनव खरे याला माहिती होती. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांचे हॉस्पिटलमध्ये चांगला मोबदला व ५० टक्के हॉस्पिटलची पार्टनरशिप देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीकडून १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये वेळोवेळी विश्वासाने घेतले. ते परत न देता स्पंदन हॉस्पिटल बंद करुन हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून फिर्यादी यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.