Budget 2025 | गंभीर आजारांवरील 36 औषधांच्या किमती कमी होणार, महिला उद्योजकांना कर्ज सुविधा, अर्थमंत्र्यांकडून महत्वाच्या घोषणा

नवी दिल्ली : Budget 2025 | देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. गंभीर आजारावरील 36 अत्यावश्यक औषधांवरील ड्यूटी टॅक्स हटविण्यात आल्याने ही औषधे स्वस्त झाली आहेत. उद्योजक महिलांसाठी कर्जसुविधा, शाळांसाठी सुविधा, अशा विविध घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केल्या.

निर्मला सीतारमण यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा

  • सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डे केयर सेंटर उभारले जातील. कॅन्सरच्या उपचारासाठी औषधे स्वस्त होणार. 6 अत्यावश्यक औषणांवरील कस्टम ड्यूटी 5 टक्के करण्यात आली आहे.
  • डिजिटल शिक्षणासाठी सर्व सरकारी माध्यमिक विद्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.
  • सरकार 10,000 कोटी रुपयांची तरतूदीद्वारे स्टार्टअप्ससाठी निधीची व्यवस्था करणार आहे. सरकार प्रथम पाच लाख महिलांना, एससी आणि एसटी उद्योजक महिलांसाठी 2 कोटी रुपयांचे कर्ज देईल.
  • भारतीय पोस्ट ऑफिस हे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्थेत परवर्तीत केले जाईल.