WhatsApp New Privacy Feature | ‘इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स’प्रमाणे व्हॉट्सअपवर मोबाईल नंबर नव्हे, ‘यूजरनेम’द्वारे होईल ओळख आणि सर्च, येतंय नवीन प्रायव्हसी फीचर

नवी दिल्ली : WhatsApp New Privacy Feature | सध्या तुम्हाला व्हॉट्सअपवर कोणाशी बोलायचे असेल किंवा डॉक्यूमेंट पाठवायचे असतील तर यासाठी आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो. व्हॉट्सअपचे नवीन फीचर आल्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स प्रमाणेच यावर सुद्धा केवळ यूजर नेमच्या मदतीने लोकांना सर्च करू शकता.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ते व्हॉट्सअप वापरू शकतात. याद्वारे मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ कॉल आणि फोटो दस्तावेज पाठवू आणि मिळवू शकतात. आता व्हॉट्सअप एक असे प्रायव्हसी फीचर आणण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर देण्याची आवश्यकता असणार नाही.

नंबर न देता होईल काम
व्हॉट्सअपचे नवीन फीचर आल्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स प्रमाणेच यावर सुद्धा केवळ यूजर नेमच्या मदतीने लोकांना सर्च करता येईल. तसेच कॉल करता येईल. म्हणजेच मोबाईल नंबर न देता तुमचे काम होईल.

व्हॉट्सअप सध्या या प्रायव्हसी फीचरवर काम करत आहे, जे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही. यामुळे यूजर्सला आणखी प्रायव्हसी मिळेल. व्हॉट्सअपने पेमेंट सुविधा सुद्धा सुरू केली आहे, ज्यासाठी सुद्धा हे नवीन फीचर उपयोगी ठरू शकते.

वेगाने वाढत असलेले सायबर फ्रॉड रोखण्यासाठी व्हॉट्सअप हे नवीन फीचर्स आणत आहे. जेणेकरून यूजर्सचा डाटा सुरक्षित राहील. यामध्ये मोबाईल नंबर न देता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करता येईल. सध्या जिथे मोबाईल नंबर दिसतो तिथे यूजर नेम दिसेल.

व्हॉट्सअपच्या या नवीन फीचरनंतर या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर यूजरनेमद्वारेच ओळख होईल. म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा फोन नंबर समजणार नाही. मोबाईल नंबर सहजपणे समजत असल्याने अनेक सायबर गुन्हेगार याचा वापर करतात.