Pune Crime Branch News | वाहन चोराच्या झडतीत मिळाले घरफोडीतील दागिने; घरफोडी, वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस, साडेसात लाखांचा माल जप्त (Video)

पुणे : Pune Crime Branch News | मोटारसायकलसह संशसास्पदरित्या थांबलेल्या चोरट्याकडील मोटारसायकल चोरीची निघाली. त्याची झडती घेतली तर त्याच्याकडे घरफोडीतील सोन्याचे दागिने मिळाले. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने त्याला अटक करुन घरफोडीचे ५, तर वाहनचोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Arrest In Theft Case)
राहुल दगडू शिंदे (वय ३२, रा. पिरंगुट) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पुणे, पिंपरी चिंचवडमधील चोरी, घरफोडी, वाहन चोरीतील गुन्ह्यामधील ६ लाख ४० हजार ३२२ रुपयांचे ८७ ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह ७ लाख ४० हजार ३२२ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. (Vehicle Theft Detection)
गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकातील अधिकारी व अंमलदार हे वाघोली परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन मुंढेयांना घरफोडीचे गुन्हे करणारा आरोपी लोहगाव – वाघोली रोडवरील डी मार्टजवळ उभा असल्याची बातमी मिळाली. बातमीच्या अनुषंगाने पथकाने तेथे जाऊन खात्री केली. तेव्हा राहुल शिंदे हा मोटारसायकलसह उभा होता. त्याला मोटारसायकलविषयी चौकशी केली़ तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यात त्याच्याकडे ८७ ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने मिळाले. अधिक चौकशीत त्याने मोटारसायकल व दागिने चोरीचे असल्याची कबुली दिली. सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर परिसरातील विविध ठिकाणी घरफोडी करुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यातील घरफोडीचे ३ गुन्हे, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे तसेच रावेत व लष्कर पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. राहुल दगडू शिंदे याच्याविरुद्ध पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चोरी, घरफोडी, वाहनचोरीने अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.