Kirloskar Brothers Limited | भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेत किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा महत्त्वाचा वाटा

एन.पी. न्यूज ऑनलाईन : Kirloskar Brothers Limited | भारतीय नौदलाच्या तीन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा (KBL) अभिमानास्पद सहभाग! आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या INS नीलगिरी (Project 17A फ्रिगेट), INS सूरत (Project 15B डिस्ट्रॉयर) आणि INS वाघशीर (स्कॉर्पियन श्रेणीतील सहावी पाणबुडी) या तीन युद्धनौकांचे 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही युद्धनौकांचे उद्घाटन केले असून त्या आता नौदलात सक्रीय झाल्या आहेत.
या अत्याधुनिक नौदल जहाजांसाठी KBL ने उच्च कार्यक्षमतेच्या कॅन्ड मोटर पंप्स (CMP) पुरवले आहेत, जे समुद्र आणि ताज्या पाण्याच्या HVAC प्रणालींसाठी वापरण्यात आले आहेत. या पंपांची अत्याधुनिक विश्वासार्हता आणि टिकाऊपणा भारतीय नौदलाच्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर घालणारे ठरले आहेत.
इंजिनिअरिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. पंप, व्हॉल्व्ह, हायड्रो-टर्बाइन आणि विविध प्रणालींच्या निर्मितीमध्ये कंपनीचे भरीव योगदान असून, जलपुरवठा, ऊर्जा निर्मिती, सिंचन, तेल आणि वायू, बांधकाम, उद्योग आणि नौदल व संरक्षण क्षेत्रासाठी किर्लोस्कर उत्पादने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
देशाच्या संरक्षण व पायाभूत धांच्या आत्मनिर्भरतेसाठी KBL सतत योगदान देत राहणार आहे.