Devendra Fadnavis On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘अजितदादांची भूमिका…’

मुंबई : Devendra Fadnavis On Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोर धरला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधकांचा दबाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” पहिली गोष्ट म्हणजे ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहे त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनामा संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.