Baner Pune Crime News | ब्लॅक मॅजिक करुन मुलीचा दोष दूर करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेला घातला 29 लाखांचा गंडा; फेसबुकवरील मैत्रीने केला घात, बालेवाडीतील घटना

पुणे : Baner Pune Crime News | मुलीचा दोष काढण्यासाठी पूजा करण्यासाठी व जादुटोणा, ब्लॅक मॅजिक (Black Magic) करण्यासाठी वृद्ध महिलेची तब्बल २८ लाख ८८ हजार ७२२ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेने आरोपींशी वैयक्तिक भेट घेतली नसून केवळ फेसबुकवरुन त्यांच्यात ओळख झाली होती. (Cheating Fraud Case)
याबाबत बालेवाडी येथील एका ६२ वर्षाच्या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात (Baner Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ ते ३१ डिसेबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीतून फिर्यादी यांनी त्यांना आपल्या मुलीची समस्या सांगितली. त्यांनी तिच्यावर कोणीतरी करणी केली असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. तिच्यातील दोष दूर करण्यासाठी पुजा करावी लागेल. लंगर करावे लागेल असे सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगितले. ते सांगतील,तसे फिर्यादी पैसे पाठवत होत्या. मुलीचा दोष काढण्यासाठी जादुटोणा, ब्लॅक मॅजिक करता पैसे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत २८ लाख ८८ हजार ७२२ रुपये पाठविले. तरीही मुलीत काही फरक जाणवला नाही. तसेच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्यात लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण (API Anil Kekan) तपास करीत आहेत.