Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या सुपरवायझरने चोरले 20 लाखांचे लोखंड, गुन्हा दाखल

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सुपरवायझरने ट्रक चालकासोबत २० लाखांचे लोखंड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुपरवायझर हरिश्चंद्र सुनील कुमार (रा. निगडी), ट्रक चालक महंमद अनिब पटेल (रा. मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Metro News)
महाव्यवस्थापक रवी रेडियार (तळवडे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि.२७) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.सदर चोरीची घटना निगडी येथील भक्तीशक्ती बस डेपो ते आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकादरम्यानच्या मेट्रोमार्गावर १० सप्टेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या दरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामावरील साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेट्रोने रवी यांची अनंत स्कायइन्फ्राटेक ही एजन्सी नेमली आहे. या एजन्सीकडून हरिश्चंद्र याला सुपरवायझर म्हणून नेमण्यात आले होते.
हरिश्चंद्र याने ट्रक चालक महंमद याच्यासोबत मिळून भक्ती-शक्ती चौक ते खंडोबा माळ चौक या दरम्यानच्या मेट्रो साईटवरून २० लाख रुपये किमतीचे ४० टन लोखंड चोरले. मेट्रोच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला.