Pune Police Inspector Transfers | शहर पोलीस दलातील 18 पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या

पुणे : Pune Police Inspector Transfers | शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या केल्याचे या आदेशात म्हटले आहे.

बाणेर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांची बाणेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक (सध्याचे ठिकाण) व त्या पुढे बदलीचे ठिकाण

नवनाथ संभू जगताप (गुन्हे, बाणेर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलिस स्टेशन

शर्मिला शिवाजी सुतार (गुन्हे, खडक) ते (गुन्हे) समर्थ पोलिस स्टेशन

संगीता संपतराव देवकाते (गुन्हे, भारती विद्यापीठ) ते सायबर पोलिस स्टेशन

अजित पोपटराव गावीत (गुन्हे, पर्वती) ते नियंत्रण कक्ष

अनिल शिवाजी माने (गुन्हे, चंदननगर) ते (गुन्हे) अंलकार पोलिस स्टेशन

गुरुदत्त गोरखनाथ मोरे (गुन्हे, विशेष शाखा) ते (गुन्हे) नांदेड सिटी पोलिस स्टेशन

विकास तुकाराम भारमळ (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) स्वारगेट पोलिस स्टेशन

रंगराव पांडुरंग पवार (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) बाणेर पोलिस स्टेशन

राजेश दत्तू खांडे (वाहतूक शाखा) ते (गुन्हे) फुरसुंगी पोलिस स्टेशन

राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर ( नियंत्रण कक्ष) ते पोलीस कल्याण

मनोज एकनाथ शेडगे (नियंत्रण कक्ष) ते कोर्ट कंपनी

स्वाती रामनाथ खेडकर (गुन्हे, येरवडा) ते (गुन्हे) चंदननगर पोलिस स्टेशन

सुरज दत्तात्रय बेंद्रे (गुन्हे, कोंढवा) ते (गुन्हे) बिबवेवाडी पोलिस स्टेशन

अमर नामदेव काळंगे (गुन्हे, हडपसर) ते (गुन्हे) काळेपडळ पोलिस स्टेशन

रजनी जालिंदर सरवदे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा

आशालता गणेश खापरे (विशेष शाखा) ते (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन

सुरेखा मोतीराम चव्हाण (गुन्हे, अलंकार) ते (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन

हर्षवर्धन वसंत गाडे (वाहतूक शाखा) ते नियंत्रण कक्ष