Pune News | ज्ञानसाधना विद्यामंदिर शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

पुणे : Pune News | प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी ज्ञानसाधना विद्यामंदिर वडगाव बुद्रुक या शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव धारेश्र्वर सेवा संस्था सिंहगड रोड या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमात राजकमल फुडसचे संचालक प्रसन्न शेळके यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमात नगरसेवक पुणे महानगरपालिका हरिभाऊ चरवड तसेच समाजातील विविध मान्यवर बाळासाहेब कंगले, प्रकाश खंकाळे, ज्ञानसाधना विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सदरच्या समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुण सादर केले आणि राष्ट्र एक संघ रहावा आणि व्यसन मुक्त व्हावा यासाठी सार्वजनिक प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली.