Ambadas Danve On Walmik Karad | संतोष देशमुख खूनप्रकरणात अंबादास दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, ”फरार असताना वाल्मिक कराडने…”

पुणे : Ambadas Danve On Walmik Karad | राज्यात सध्या गाजत असलेले सरपंच संतोष देशमुख खून आणि खंडणी प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. (Santosh Deshmukh Murder Case)
बीड प्रकरणी गंभीर आरोप करताना अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्यांने यातच लक्ष दिले, मालमत्ता ट्रान्सफर केल्या. मुंडेंच्या राजीनाम्याची आमची भूमिका आहे, असे दानवे म्हणाले.
यावेळी अंबादास दानवे यांनी बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात समोर आलेल्या खळबळजनक माहितीवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी झिशान सिद्दीकी यांना भेटलो. ते म्हटले तपास चुकीच्या दिशेने जात आहे. सरकारने नव्याने तपास करावा. जर सत्यता असेल तर नेता बिल्डर कोण होता? फोन का केला होता? याचा तपास करावा.
तर एसटी दरवाढीवरुन महायुती सरकारवर निशाणा साधताना दानवे म्हणाले की, एसटीच्या काचा, सिट व्यवस्थीत नाहीत आणि दरवाढ कसली करतात. महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. भ्रष्टाचार झाला आहे हे मी आधीच सांगितले आहे, असे दानवे म्हणाले.