What Is EPFO Scheme Certificate | तुम्ही सुद्धा करत असाल EPFO मध्ये गुंतवणूक, तर जाणून घ्या ‘स्कीम सर्टिफिकेट’ म्हणजे काय? कुठे उपयोगी पडते?

नवी दिल्ली : What Is EPFO Scheme Certificate | जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल, आणि दर महिन्याला EPFO मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला स्कीम सर्टिफिकेट बाबत माहिती असणे आवश्यक आहे. नोकरदारांसाठी हे सर्टिफिकेट खुप कामाचे आहे. जे EPFO द्वारे जारी केले जाते.

ईपीएफओच्या स्कीम सर्टिफिकेटमध्ये कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाची माहिती असते, जी हे स्पष्ट करते की कर्मचारी पेन्शन योजनेचा सभासद आहे. या सर्टिफिकेटच्या माध्यमातून नोकरी बदलण्याच्या स्थितीत पेन्शन खात्यात जमा रक्कमेचे हस्तांतरण सोपे होते.

कुठे उपयोगी पडते स्कीम सर्टिफिकेट

असे लोक जे लागोपाठ दहा वर्षांपासून EPFO मध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांना पुढे नोकरी करायची नाही, त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट कामाचे आहे. असे लोक हे सर्टिफिकेट मिळवून निवृत्तीच्या वयानंतर पेन्शन मिळवू शकतात. या सर्टिफिकेटच्या वापराने नंतर पेन्शनसाठी क्लेम करणे सोपे होते.

याशिवाय एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत नोकरी बदलली जाते आणि दुसरी संस्था ईपीएफओच्या कक्षेत येत नसेल तर अशावेळी कर्मचार्‍यांनी स्कीम सर्टिफिकेट घेतले पाहिजे. कारण काही वर्षानंतर कर्मचारी जर पुन्हा अशा संस्थेत नोकरीसाठी रूजू होत असेल जी ईपीएफओ अंतर्गत येते तर या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पुन्हा सहजपणे कॉन्ट्रीब्यूशन सुरू करू शकता.

असे मिळवा स्कीम सर्टिफिकेट

यासाठी फॉर्म 10सी भरावा लागतो. हा फार्म EPFO च्या वेबसाईटवर अथवा ऑफिसद्वारे मिळेल. तो भरल्यानंतर ईपीएफओ कार्यालयात जमा करा. फॉर्मसोबत कर्मचार्‍याची माहिती, कुटुंबाची माहिती आणि कॅन्सल चेक जमा करावा लागतो.

जर कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर वारसांद्वारे हा फॉर्म भरला जात असेल तर मृत्युचा दाखला, वारस दाखला आणि स्टँप तिकिटसुद्धा जमा करावे लागू शकते.