Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या रक्तदान महाशिबीरात 3465 रक्तपिशव्याचे संकलन

सलग ५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन; सुरेंद्र पठारे यांनी मानले रक्तदात्यांचे आभार
खराडी (पुणे) : Surendra Pathare Foundation | प्रजासत्ताक दिन व सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आयोजित रक्तदान महाशिबीर हे समीकरण मागील ५ वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुणे शहरात सर्वत्रच या शिबिराची चर्चा होताना दिसत आहे. खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम या ठिकाणी (ता. २६) हे रक्तदान महाशिबीर नागरिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाले. यंदा या शिबिराचे ५ वे वर्ष होते. वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare MLA) यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, ध्वजावंदनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला.
२०२१ पासून फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत रक्तदान महाशिबीर आयोजित करण्यात येत आहे. २०२१ साली १६४४, २०२२ साली ३४५३, २०२३ साली ३५९३, २०२४ साली ३६७१ तर यंदा ३४६५ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. सोबतच, शिबिराप्रसंगी रक्तदानाबद्दल जनजागृती करण्याचे कामही फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
“रक्तदान महाशिबीर हाच दरवर्षी आमचा पहिला संकल्प असतो आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करून पुढील समाजोपयोगी उपक्रमांसाठी आम्ही सज्ज राहतो. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादातच या शिबिराची यशस्वीतता दडलेली आहे. दरवर्षी नागरिक बांधव न चुकता रक्तदान करतात. हे फार समाधानाचे आहे. आरोग्य यंत्रणेला जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. यात रक्तदात्यांचा तसेच शिबिरातील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांचा मोलाचा वाटा आहे”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ कुस्ती संघटक व शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त पंढरीनाथ (अण्णासाहेब) पठारे यांनीही शिबीराला विशेष शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
रक्ताचे दान ठरतेय गरजूंसाठी वरदान
सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या माध्यमातून सलग ५ वर्षे होत असलेल्या रक्तदान महाशिबीरामुळे अनेक गरजूंना फायदा होत आला आहे. वेळप्रसंगी अनेकदा फाऊंडेशनने रक्तासाठी गरजू व्यक्तींना मदत केली आहे. हे रक्तदान महाशिबीर वरदान ठरत असल्याचे नागरिक सांगतात.