Special Plan For Farmers | आडते-दलालांची होणार सुट्टी! शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारची ‘विशेष योजना’, नफा वाढणार

नवी दिल्ली : Special Plan For Farmers | केंद्र सरकार एका अशा योजनेवर काम करत आहे, ज्याद्वारे शेतकर्‍यांचा नफा वाढणार आहे. सध्या अनेक शेतकरी आडते-दलालांच्या माध्यमातून पिकांची विक्री करतात, ज्यामुळे त्यांना आपल्या कष्टाचे पूर्ण पैसे मिळत नाहीत.

मध्यस्थांची भूमिका होईल कमी

सरकार ज्या नवीन योजनेवर काम करत आहे, त्यामध्ये मध्यस्थांची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली.

‘शेतातून थेट ग्राहकांकडे’ योजना

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, सरकार ‘शेतातून थेट ग्राहकाकडे’ योजना लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचे जास्तीत जास्त पैसे मिळू शकतील. चौहान म्हणाले, शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून याशिवाय भारत समृद्ध होऊ शकत नाही.

शिवराज सिंह चौहान म्हणाले, शेती हा जरी राज्याचा विषय असला तरी केंद्र सरकारद्वारे शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कृषी खेत्राच्या विकासातून भारताला विकसित देश बणण्यासाठी मदत होईल. राज्य सरकारांसोबत मिळून केंद्र सरकार शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी काम करेल.