Dance Bar In Maval | पुणे : मावळमधील ‘त्या’ रेस्टॉरंटमध्ये डान्स बार? छमछम ! 20 ते 25 महिलांचे अर्धनग्न अवस्थेत नृत्य (Video)

मावळमधील फ्लेवर्स रेस्टॉरंटमध्ये डान्स बार? व्हिडिओ काढल्याने गोळीबार केल्याचा वकिलाचा आरोप, हॉटेलवर पोलिसांनी नुकतीच केली होती कारवाई
पुणे : Dance Bar In Maval | मावळ तालुक्यातील दोन ऑकेस्ट्रा बारवर (Orchestra Bars In Maval) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (IPS Satyasai Kartik) यांनी कारवाई केली असताना त्यातील एका रेस्टॉरंट अॅन्ड बारमध्ये चक्क डान्स बार सुरु असल्याचा एका वकिलांनी आरोप केला आहे. इतकेच नाही तर आपण त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यातील एकाने आपल्यावर गोळीबार केल्याचे या वकिलाने ग्रामीण पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत लोणावळा विभागाचे (Lonavala Division) सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार नुकतीच मिळाली असून आपण त्याची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करत आहोत.
वडगाव मावळ येथील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंटमध्ये (Flavors Resto & Bar Maval) विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी ग्राहकांना खाद्य पदार्थ, दारु इत्यांदी विक्री केली जात होती़ तसेच वाद्य, ऑकेस्ट्रा चालू ठेवलेला आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांनी वडगाव मावळमधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट आणि कामशेतमधील दीपा बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई केली होती.
याबाबत अॅड. मनोज सतिश माने (वय ३४, रा. हेवन पार्क) यांनी तक्रार केली आहे. ते २५ जानेवारी रोजी पहाटे मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज संपवून पुण्याकडे पहाटे २ वाजता येत होते. वडगाव मावळ येथील फ्लेवर्स रेस्टॉरंट अँड बार चालू दिसल्याने ते मित्रासमवेत जेवणाकरीता गेले. हॉटेलमध्ये कर्कश आवाजात गाणी सुरु होती. या गाण्यांवर २० ते २५ महिला अर्धनग्न अवस्थेत नृत्य करीत होत्या. उपस्थित असलेले पुरुष ग्राहक त्यांचेवर पैसे उधळत होते. हा प्रकार अॅड. मनोज माने यांना गैर वाटल्याने त्यांनी मोबाईलवर चित्रिकरण करण्यास चालू केले. हे पाहून तेथील एक जण व त्याच्याबरोबर ५ ते ६ जण येथून तू माझ्या हॉटेलमध्ये कशाला व्हिडिओ काढतो, तू कोण आहेत, असे म्हणून शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. माझ्या हातातील मोबाईल ओढून घेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या वाहनचालक व दोन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळेस त्यांनी बाजूला जाऊन ११२ वर कॉल करुन पोलिसांना बोलविले. त्यावर त्यातील एकाने पिस्टल काढून त्यांच्याकडे रागाने पळत येऊन ‘‘तू पोलीस को बुलाता है, तुझे तो आज मार ही डालता हू, मुझे मनिष कुमार बोलते है, ’’ असे म्हणून माने यांच्या दिशेने गोळी फायर केली. ती त्यांनी चुकवून ते हॉटेलच्या बाहेर पळाले.
त्याचवेळेस तेथे एक पोलीस कर्मचारी आल्याने त्याचे गाडीवर बसून ते वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गेले. हवालदार काळे हे घटना लिहून घेत असताना अचानक मोहिते नावाच्या महिला अधिकारी आल्या व त्यांनी आरडाओरडा करुन ‘‘तुला तेथे कोणी जायला लावले़ तुझ्यावर कारवाई करते थांब, याला ताब्यात घ्या रे, ’’ असे इतर पोलिसांना बोलून मलाच तेथून हुसकावून लावले.
या डान्सबारचालकांना येथील पोलीस देखील सामील आहेत, हे त्यांना समजल्याने त्यांनी तेथून स्वत:चा जीव वाचवून पुण्याला घरी निघून आले. ही हकीकत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS), सहायक पोलीस अधीक्षक सत्यकार्तिक आणि वडगाव मावळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांना कळविली आहे. परंतु, कदम यांनी याबाबत टाळाटाळ केल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे.
याबाबत विचारले असता सहायक पोलीस अधीक्षक सत्यकार्तिक म्हणाले, की हा तक्रार अर्ज आताच मिळाला असून त्याबाबत चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करीत आहोत.
पूर्वी पनवेल आणि मावळ हे डान्स बारसाठी कुप्रसिद्ध होते. पुण्यातील धनाढ्य, गुन्हेगार या डान्सबारमध्ये जाऊन नाचणार्या तरुणींवर पैसे उधळत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील सर्व डान्स बार बंद केले. त्यानंतरही अधून मधून गुपचुप डान्स बार सुरु असल्याचे आढळून येत असते.