Children Education Planning In Abroad | मुलांना परदेशात शिकवायचे आहे का? असे करा फायनान्शियल प्लॅनिंग, ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

नवी दिल्ली : Children Education Planning In Abroad | जर तुम्हाला तुमच्या मुलांना परदेशात शिक्षण द्यायचे असेल, तर यासाठी आर्थिक योजना बनविणे खुप आवश्यक आहे. परदेशातील शिक्षणाचा खर्च भारताच्या तुलनेत खुपच जास्त असतो, आणि यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की ट्यूशन फी, राहण्याचा-खाण्याच्या खर्च, प्रवास खर्च इत्यादी.

परदेशात शिक्षणाचा खर्च :

ट्यूशन फी (एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये) :
अमेरिका/यूरोप : रू. 20 लाख ते रू. 40 लाख प्रति वर्ष
ऑस्ट्रेलिया : रू. 15 लाख ते रू. 30 लाख प्रति वर्ष.
कॅनडा : रू. 10 लाख ते रू. 25 लाख प्रति वर्ष.
हे आकडे काळाप्रमाणे वाढू शकतात, यासाठी महागाई दर लक्षात घ्या.

राहण्याचा आणि खाण्याचा खर्च :
हा खर्च प्रति वर्ष जवळपास रू. 7 लाख ते रू. 15 लाखापर्यंत होऊ शकतो, जो देश आणि शहरानुसार बदलू शकतो.

प्रवास आणि इतर खर्च :
अंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेडिकल इन्श्युरन्स, पुस्तके, शॉपिंग इत्यादीसाठी दरवर्षी रू 2 लाख ते रू. 4 लाखापर्यंत खर्च होऊ शकतो. परदेशात एका मुलाच्या 3 वर्षाच्या शिक्षणासाठी जवळपास रू. 70 लाख ते रू 1.2 कोटी इतका खर्च होऊ शकतो.

दिर्घकालीन योजना बनवा
परदेशातील शिक्षणासाठी लागणारा पैसा जमविण्यासाठी दीर्घकालीन योजना बनवावी लागेल. यासाठी जेव्हा तुमचे मुल लहान असेल तेव्हाच गुंतवणूक सुरू करा.

जर सध्या तुमचे मुल छोटे असेल आणि 10-12 वर्षानंतर त्याला परदेशात पाठवायचे असेल, तर आतापासूनच गुंतवणूक करणे चांगले ठरेल.

या 3 ठिकाणी करा गुंतवणूक
एसआयपी : म्यूचुअल फंड्समध्ये एसआयपीद्वारे दर महिना नियमित गुंतवणूक
स्टॉक्स : जर तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर, शेयर बाजारात सुद्धा गुंतवणूक करू शकता.
पेन्शन योजना : दिर्घकाळासाठी ईपीएफ आणि पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

तुमच्याकडे 5-10 वर्षे असतील तेव्हा या काळात गुंतवणुकीला स्थिर करू शकता. फिक्स्ड डिपॉझिट आणि बॉन्ड्स सारखा सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडू शकता, ज्यामुळे जोखीम कमी होईल.

शेवटचा टप्पा (शिक्षण सुरू होण्यापूर्वी 1-2 वर्ष आधी)
या काळापर्यंत तुमच्याकडे आवश्यक पैसे जमा झालेले असावेत. या काळात कमी जोखीम असलेल्या पर्यायात पैसे गुंतवल्यास पैसे सुरक्षित राहतील.

परदेश शिक्षण कर्ज
जर तुमच्याकडे आवश्यक पैसे नसतील तर तुम्ही शिक्षण कर्ज घेऊ शकता. भारतीय बँक आणि आर्थिक संस्था परदेशी शिक्षणासाठी कर्ज देतात.

टॅक्स बचत योजना
तुम्ही पीपीएफ, एनएससी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे बचतीसह भविष्यासाठी चांगली रक्कम जमा होईल.

परदेशी स्कॉलरशिप आणि आर्थिक मदत
परदेशात शिक्षण घेत असताना विविध स्कॉलरशिप्स आणि फायनान्शियल मदत मिळू शकते. याकडे लक्ष दिल्यास, काही खर्चात दिलासा मिळेल.

इन्श्युरन्स आणि मेडिकल खर्च
मुलांना परदेशात शिक्षण देत असताना मेडिकल इन्श्युरन्सकडे देखील लक्ष दिले पाहिजे.