Pune Crime News | डिस्कोथेक परवाना नसतानाही साऊंड सिस्टिमवर संगीत वाजवून नियम भंग करणाऱ्या हॉटेल बच्चुस डिनर क्लब (बाकस) च्या चालकांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | हॉटेलसाठी डिस्कोथेकचा परवाना नसताना साऊंड सिस्टिमवर म्युझिक वाजवून नियमभंग करणाºया राजा बहादुर मिल येथील हॉटेल बच्चुस डिनर क्लब (बाकस) Bacchus Diner Club यांच्या चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम (API Nandkumar Kadam) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कपील फुलसे Kapil Phulse (रा. माऊलीनगर, दिघी), अनुज विनोदकुमार अगरवाल Anuj Vinodkumar Agarwal (रा. सोपानबाग, घोरपडी), जतीन राजपाल Jatin Rajpal (रा. सोपानबाग, घोरपडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा बहादुर मिल (Raja Bahadur Mill) येथील हॉटेल बच्चुस डिनर क्लब ऊफ बाकस या पबमध्ये डिस्कोथेक आहे. या डिस्कोथेकचा परवाना संपला असताना त्यांनी त्याचे नुतनीकरण न करताना तो डिस्कोथेक चालू ठेवला होता. बंडबार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तेथे गेले होते. त्यांनी डिस्कोथेकचा परवाना तपासला, तेव्हा त्याची मुदत संपून गेली होती. असे असतानाही साऊंड सिस्टीमवर संगीत वाजवून शासकीय नियमांचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार (PSI Swapnil Lohar) अधिक तपास करीत आहेत.