Bengaluru Is Closed For North Indian | कर्नाटकात भाषावाद उफाळला; हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद, कन्नड शिकायचं नसेल तर…

बंगळुरू : Bengaluru Is Closed For North Indian | कर्नाटकात सध्या भाषिक वाद उफाळून आला असून बंगळुरूत बहुभाषिक लोक राहतात. तेथिल स्थानिकांनी परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांना कन्नड भाषा शिकण्याचा सल्ला दिला आहे. हे प्रादेशिक संस्कृतीचा सन्मान करण्यासारखं असल्याचे म्हंटले आहे. त्यातून एका ट्विटर युजरने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://x.com/Paarmatma/status/1882293111738736713?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1882293111738736713%7Ctwgr%5E012ac8c818dd1a9556c373faa4383d635751f5ae%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fbengaluru-is-closed-for-north-india-and-neighbouring-states-who-doesnt-want-to-learn-kannada-post-is-viral-a-a629%2F

या ट्विटर पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की, ज्यांना कन्नड शिकायचे नाही त्यांच्यासाठी बंगळुरू उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंद आहे. जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणार नसतील त्यांनी बंगळुरूत येऊ नये. ज्यांना कन्नड शिकण्याची गरज वाटत नाही. जे भाषा, संस्कृतीचा सन्मान करत नसतील त्यांची बंगळुरूला येण्याची आवश्यकता नाही, असे आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. या पोस्टवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून १ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यावर ७०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. काही युजर्स या पोस्टशी सहमत आहेत तर काहींनी त्याला विरोध केला. एकाने यावर टीका करत “दुसरी भाषा शिकणे ही व्यक्तिगत आवड असू शकते आणि कुणी एखाद्यावर थोपवू शकत नाही”, असे म्हंटले आहे. तर दुसऱ्याने मी या पोस्टशी सहमत असल्याचे म्हणत सरकारने बंगळुरूत काम करणाऱ्यांसाठी भाषा येणे बंधनकारक केले पाहिजे, असे म्हंटले आहे.

दरम्यान, एका युजरने त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बंगळुरू आज दुसऱ्या राज्यातील मेहनती लोकांमुळे अस्तित्वात आहे. ज्यांचे तिथल्या विकासात योगदान आहे हे विसरू नका. आता जेव्हा इथं सर्वकाही बनले आहे तेव्हा तुम्हाला दुसऱ्या लोकांनी इथून निघून जावं असं वाटते का? कन्नड लोकं आणि कर्नाटक सरकारची लाज वाटते जे शांतपणे हे सर्व पाहत आहेत”, असं त्याने म्हटलं आहे.