Pune PMC News | शहराच्या एन्ट्री पॉईंटसवर महापालिका उभारणार अत्याधुनिक वातानुकुलीत सात VIP स्वच्छतागृहे

पुणे : Pune PMC News | महापालिकेच्यावतीने नागपूरच्या धर्तीवर शहराच्या एन्ट्री पॉईंटस्वर अत्याधुनिक वातानुकुलीत सात व्हीआयपी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. ‘पे अँन्ड यूज’ सूत्रांनुसार उभारण्यात येणारी ही स्वच्छतागृह प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतील, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी झालेल्या बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार शहराच्या सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, आहील्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशन जवळ अशा ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. एका स्वच्छतागृहासाठी साधारण पन्नास लाख रुपये खर्च आहे. ही स्वच्छतागृह उभारणे आणि त्यांची देखभाल करणे यासाठीच्या विविध पर्यायांसह इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याचे संदीप कदम यांनी सांगितले. स्वच्छतागृहाची उभारणी आणि देखभाल दुरूस्तीसाठी उत्पन्नाचे पर्याय म्हणून याठिकाणी संबधिताला जाहिरातींचे हक्कही देण्याचा पर्याय राहील, असेही कदम यांनी नमूद केले.
कशी असतील स्वच्छतागृह
स्वच्छतागृहांमध्ये वातानुकुलीत यंत्रणा असेल. आंघोळीसाठी अद्ययावत बाथरूमची व्यवस्था तसेच चेजींग रुम आणि प्रसाधनगृहही असेल. मोबाईल, लॅपटॉप चार्जींगची तसेच वायफाय सुविधा असेल. महिला आणि पुरूषांसह तृतीयपंथी देखिल याचा वापर करू शकेल अशी सुविधा असेल. अपंगांना तेथे सुरक्षितरित्या पोहोचता येईल, अशी व्यवस्था असेल. येथे केअर टेकर सोबतच स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असतील, अशी माहिती संदीप कदम यांनी दिली.