Chandrashekhar Bawankule | राज्यात नवीन जिल्हे तयार होणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले – ‘अनेक ठिकाणी …’

नागपूर : Chandrashekhar Bawankule | राज्यात नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत, अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवीन जिल्हे बनविण्याबाबत कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे आला नसल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले आहे. (Chandrashekhar Bawankule On New District In Maharashtra)
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ” सध्या नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो, परंतु अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना उभारण्याचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.