Solapur Crime News | शेतातील झाडाला गळफास घेत तरुणाने संपवलं जीवन

सोलापूर : Solapur Crime News | बार्शी तालुक्यातील खामगाव येथे शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अक्षय रवींद्र पाटील (वय-३१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार (दि.२२) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. (Suicide Case)
याबाबत पांगरी पोलिसात हर्षद हरिदास मुठाळ (वय- ३३ रा. खामगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी शेतात जात असताना दादासाहेब प्रभाकर पाटील यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला अक्षय पाटील यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास पोलिस श्रीहरी घोडके करीत आहेत.