Khadki Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना खडकी पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : Khadki Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याच्या (Attempt To Murder) गुन्ह्यात टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून गेली दोन वर्षे ते फरार होते. खडकी पोलिसांनी (Khadki Police) या दोघा सराईत गुन्हेगारांना तळेगाव दाभाडे व उरुळी कांचन येथून जेरबंद केले. (Criminal Arrest Who Abscond In MCOCA Case)

अतिक धमेंद्र गरुड (वय ३५, रा. एस आर ए बिल्डिंग, वारजे) आणि अनुज अविनाश् वाघमारे (वय २३,रा. आंबेडकर चौक, औंध रोड) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.

खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २०२३ मध्ये दाखल होता. त्यात पोलिसांनी १३ नोव्हेंबर २०२३ रोजी मोक्का कारवाई केली होती. तेव्हापासून दोघे जण फरार झाले होते. या आरोपींबाबत तांत्रिक तपास करुन अतिक गरुड हा तळेगाव दाभाडे तर अनुज वाघमारे हा उरुळी कांचन येथे रहात असल्याची बातमी मिळाली. खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन्ही ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्याकडे सुपुर्द केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निीरक्षक दिलीप फुलपगारे, गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ, पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, अतुल इंगळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी यांनी केली आहे.