Beed News | सर्दीचं दुखणं अंगावर काढणं भोवलं, श्वास घेण्यास त्रास झाल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

बीड : Beed News | सर्दीचे दुखणे अंगावर काढल्यामुळे श्वसनाचा त्रास वाढला. यामध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विजय मधुकर धोंडरे (वय-२२, रा. जातेगाव, ता. गेवराई, हल्ली मुक्काम बीड) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार (दि.२२) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास गेवराईतील जातेगावात घडली

मिळालेल्या माहितीनुसार, विजय धोंडरे यास वातावरणात थोडाफार बदल होताच सर्दी होते. यावर उपचार घेतल्यानंतर आराम मिळत असे. मात्र, सोमवारी (ता २०) रोजी त्यांना सर्दी झाली. परंतू या वेळेस विजयला श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मंगळवार मध्यरात्रीनंतर विजय धोंडरे यास श्वास घेण्यास अधिकचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी या युवकास वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतू डॉक्टरांना यश आले नाही. सर्दीचे दुखणे अंगावर काढल्यामुळे विजय धोंडरे या तरुणाचा मृत्यू झाला.