Pune Crime Branch News | DP मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद ! 12 गुन्हे उघडकीस, साडेदहा लाखांचा माल जप्त

पुणे : Pune Crime Branch News | विद्युत रोहित्र डी पी मधील तांब्याच्या तारा चोरी करण्यासाठी चोरटे डी पी मधील ऑईल सांडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेतात. त्यामुळे त्या परिसरात होणारा विद्युत पुरवठा खंडीत होतो. डी पी दुरुस्तीला वेळ जातो. त्यातून गावच्या गाव अंधारात राहते. वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. लोणीकंद व वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणचे डी पी मधील तांब्याच्या तारा चोरुन नेण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक याचा समांतर तपास करत होते. पोलीस अंमलदार तनपुरे यांना मिळालेली माहिती व तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलिसांनी चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यातील १० लाख ४२ हजार २६० रुपयांचा माल जप्त केला आहे.
अबरार बिलाल अहमद (वय२४, रा. जमुनी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), आफताब नियामतउल्ला खान (वय ३२, रा. बोरीगाव, उरण, नवी मुंबई), नफीज हमीद अब्दुल (वय २३, मुळ रा. जमुनी, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर), मोबीन हमीद अब्दुल (रा. कोंढापूर, ता. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हे चोरटे डी पी खाली घेऊन त्याचा विद्युत प्रवाह बंद करुन त्यातील ७५ ते ८० किलो तांब्याच्या तारा चोरुन नेत होते. गेल्या वर्षभरात त्यांनी अशा प्रकारे अनेक चोर्या केल्या होत्या.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण,सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.