Crime News | पत्नीचं आधारकार्ड वापरून गर्लफ्रेंडला नेलं हॉटेलमध्ये, नग्नावस्थेत बिझनेसमॅनचा मृतदेह आढळल्याने खळबळ

लखनौ : Crime News | लखनौमधील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडबरोबर राहात असलेले राजस्थानमधील बिझनेसमॅन निलेश भंडारी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यावेळी निलेश यांचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर निलेश यांची गर्लफ्रेंड घटनास्थळावरून पळून गेली. निलेश यांच्या पत्नीच्या आधार कार्डवर ती हॉटेलमध्ये राहात असल्याची माहिती मिळत आहे.
चिनहट मधील हॉटेलच्या रूम नंबर २०८ मध्ये ही घटना घडली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी २० जानेवारी रोजी पोलिसांना एका गेस्टचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. सध्या हॉटेलचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेऊन पोलीस फुटेज तपासत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , बिझनेसमन निलेश भंडारी हे मूळचे राजस्थानमधील जालोर येथील रहिवासी होते. त्यांचा बंगळुरू आणि सूरतमध्ये व्यवसाय होता. ते एका मीटिंगच्या निमित्ताने लखनौला आले होते. तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड दोन दिवस हॉटेलमध्ये राहिली होती. याच दरम्यान, सोमवारी रात्री निलेश यांचा मृत्यू झाला. निलेश यांनी त्यांच्या पत्नीच्या आधार कार्डचा वापर करून आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. तपासादरम्यान पोलिसांना पत्नीचे आधार कार्ड मिळाले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, निलेश यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की, निलेश यांच्यासोबत नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.