Wanwadi Pune Crime News | चोरुन काढलेला व्हिडिओ व्हायरल करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या

पुणे : Wanwadi Pune Crime News | चोरुन काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Blackmailing) देऊन ३० हजार रुपयांची खंडणी मागणारा तसेच शरीरसुखाची मागणी करणाऱ्या (Demanding physical pleasure) नराधमाला नाशिक येथून अटक करण्यात आली.

कृष्णा संपत शिंदे Krishna Sampat Shinde (वय २०, रा. चव्हाण मळा, नाशिक रोड) असे या नराधमाचे नाव आहे. आरोपी याने एका महिलेचा खासगीतील व्हिडिओ शुट करुन तो बनावट इन्स्टा आय डी तयार करुन व्हायरल केला. आणि तो डिलिट करण्यासाठी पिडितास ३० हजार रुपयांची मागणी केली. ते न दिल्यास शरीर सुखाची मागणी केली. पीडित महिलेने याची फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे (PSI Dhanaji Tone) यांनी तपासाची वेगाने सुत्र फिरवली. पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण करुन सोशल मीडियाबाबत माहिती घेतली. आरोपींचा माग काढत पोलीस पथक नाशिकला पोहचले. त्यांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने कृष्णा शिंदे याला अटक केली. त्याच्याकडे तपास करता त्याने पैशांची गरज असल्यामुळे पिडित महिलेचा खासगीतील व्हिडिओ शुट केला. तो बनावट आयडी तयार करुन इन्स्टा वर व्हायरल केला. तो डिलिट करण्यासाठी पैशांची मागणी केली होती.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ़ राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, ,गोपाळ मदने, सर्फराज देशमुख, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे.