Pune Crime News | पुणे: हॉटेलच्या रूममध्ये बहीण-भावानं संपवलं जीवन, घटनास्थळी आढळली सुसाईड नोट

Crime Logo

पुणे : Pune Crime News | पुण्याचे रहिवासी असलेले बहीण-भाऊ केरळ येथील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता, भाऊ फाशी घेतलेल्या अवस्थेत आणि बहिणीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. डाकताई कोन्तिबा बामन (वय-४८) आणि मुक्ता कोन्तिबा बामन (वय-४५) अशी दोघांची नावे आहेत.

घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये “आमच्याकडे ना घर आहे, ना नोकरी. आमचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करू नका”, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. मृतावस्थेत असलेली बहीण दिव्यांग होती. त्यामुळे दिव्यांग बहिणीच्या उपचारासाठी दोघे तिरुवनंतपुरमला आल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.१७) दोघे बहीण-भाऊ यांवी थंपनूर येथील एका हॉटेलमध्ये राहिले. मात्र रविवारी (दि.१९) सकाळीपासून त्यांच्या हॉटेल रूममधून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. रुममधून हालचाल न झाल्याने कर्मचाऱ्यांना काहीतरी संशयास्पद जाणवले. त्यानंतर त्यांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला. त्यावेळी दोघे बहीण- भाऊ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. भाऊ फासावर लटकलेल्या अवस्थेत, तर बहीण हॉटेलमधील बेडवर पडलेली होती. प्राथमिक तपासात भावाने आधी बहिणीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.