Koregaon Park Pune Crime News | पुणे : कोरेगाव पार्कमध्ये खुलेआम सुरु होते हुक्का पार्लर, बेकायदा दारु विक्री देखील; पोलिसांकडून हॉटेल पाल्मोकोवर कारवाई

पुणे : Koregaon Park Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी गेल्या गुरुवारी कोरेगाव पार्क परिसराला भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला. येथील अवैध धंदे आणि मसाज पार्लर, वाहतूक कोंडीच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. त्यानंतर दोनच दिवसात कोरेगाव पार्कमध्ये खुलेपणाने हुक्का पार्लर आणि बेकायदा दारु विक्री सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कोरेगाव पार्क लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर (Palmoco Koregaon Park) कारवाई केली. (Police Raid On Hookah Parlour)
याबाबत पोलीस हवालदार प्रविण सुधीर पडवह यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिवा वासुदेव सरकार (वय ३२, रा. वडगाव शेरी), शाहीद निशार अहमद हुसेन (वय २१, रा. कोरेगाव पार्क) आणि नबिल मकसुद पिरजादे (वय ३०, रा. वारजे माळवाडी), इम्रान मोहम्मद गौस रेहाली (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हॉटेल पाल्मोका येथे रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी कोरेगाव पार्क येथील लेन नं़ ५, ६, ७ मध्ये पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस पथक लेन नंबर ७ मध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना हॉटेल पाल्मोको मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य अल फकेर व रॉयल स्मोकीन नावाचे हुक्का फ्लेवर असा २२ हजार ९६ रुपयांचा माल ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या विक्रीकरता ठेवलेला दिसून आला. त्याचप्रमाणे दारु विक्रीची कोणताही परवाना नसताना हॉटेलचे किचन रुममध्ये १३ हजार ५७५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे (PSI Narendra Shinde) तपास करीत आहेत.