Pune Crime News | पुणे: धमकी दिल्याचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण करुन दांगटनगरचा भाई म्हणविणार्‍या गुंडाने परिसरात पसरवली दहशत

Hadapsar Pune Crime News | Pune: Businessman threatened to kill for not providing TV, microwave oven for Home Monitor program in Hadapsar

पुणे : Pune Crime News | भावाला धमकी दिल्याबाबत जाब विचारल्याने चिडून मी दांगटनगरमधला भाई आहे, तुला सोडणार नाही, असे म्हणून गुंडाने तरुणाला लाथाबुक्क्यांनी व टणक वस्तूने मारहाण (Marhan) करुन जबर जखमी केले.

याबाबत वैष्ण सुरेश थोपटे (वय २४, रा. विवान सोसायटी, दांगट इस्टेट, शिवणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police)फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सराईत गुंड गौरव कांबळे व त्याचा मित्र सोन्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रामनगरमधील दांगट इस्टेट येथे १५ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कांबळे हा रेकॉर्डवरील गुंड असून मारामारी, दहशत पसरविणे असे दोन गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल आहेत. आरोपी गौरव कांबळे याने फिर्यादीच्या भावाला धमकी दिली होती. फिर्यादी यांनी त्याचा जाब गौरव याला विचारला. त्यावर चिडून गौरव कांबळे याने मी दांगटनगर मधला भाई आहे. मी तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन कसल्यातरी टणक वस्तूने फिर्यादी यांच्या तोंडावर, ओठांवर, डोक्यात, पायावर मारहाण करुन जखमी केले. परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक नायकवडे तपास करीत आहेत.