Pune Crime Court News | दिल्लीहून पुण्यात नकली नोटा सप्लाय करणाऱ्या टोळीतील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Crime Court News | Sarpanch Gajanan Shende, accused in the fraud case, acquitted; Ghatanji court verdict

पुणे : Pune Crime Court News | पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दिल्ली येथून नकली नोटा चलनात आणण्यासाठी सदर नोटा सप्लाय करणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपी नामे अफजल शमशुद्दीन शहा. (रा- सेक्टर १२-ई, झमझम अपार्टमेंट, कोपरखेरने, नवी मुंबई.) या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित एन. मरे (Judge A.N. Mare) यांनी जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली.

सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती, पैकी काही आरोपींकडून पुणे, मुंबई, दिल्ली तसेच इतर ठिकाणाहून असे ५०० रुपये दराच्या नकली नोटा एकूण २०७० जप्त करण्यात आले होते. याबाबत सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८०, ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (जुना कायदा भा. द. वि. ४८९(ग), ४२०, ३४.

सविस्तर माहिती अशी की, प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी नामे महेश मंडलीक हे सहकार नगर पोलिस स्टेशन येथे पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. फिर्यादी यांच्या फिर्यादनुसार सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक ०८/१०/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत असताना पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉप समोर पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना पाहून एक जण गडबडीत बसस्टॉपवरुन गडबडीने स्वारगेट च्या दिशेने निघून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले, त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने निलेश विरकर असे सांगितले. तसेच त्याला गडबडीत निघून जाण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याचा हात सतत खिशात जात असल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात ५०० रुपये किमतीच्या नोटांचा बंडल मिळाले. त्याच्या कडे आणखीन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरच्या नोटा नकली असून रात्रीच्या वेळी अंधारात फायदा घेऊन चलनात चालवण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या, असे सांगितले. त्यानंतर स्टाफ सहित पंचासमक्ष सर्व नोटा जप्त केल्या. त्यानुसार नोटा जवळ बाळगून त्याची बाजारात चलनात आणण्याची तयारी दिसून आल्याने त्याचे हे कृत्य गैरकायदेशीर असल्याने आरोपी विरुद्ध कायदेशीर तक्रार दिली.

त्यानंतर तपास पथकाने आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तपासात आरोपी निलेश विरकर याला घेऊन कोपरखैरणे येथे घेऊन गेले. निलेश वीरकर याला शाहीर कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी सैफान पटेल, अफजल शहा, यांना अटक केली. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२४ रोजी शाहीद कुरेशी याला नवी मुंबईतून अटक केली. शाहीद कुरेशी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला नकली नोटा शाहफहड अन्सारी याच्याकडून आल्याची व त्याच्याकडे आणखी नकली नोटा असल्याची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी शाहफहड अन्सारी याला अटक केली. या पाच जणांकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या २०७० नकली ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. अन्सारी याच्याकडे तपास केल्यावर या नकली नोटा त्याने दिल्ली तसेच उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथून आणल्याचे सांगितले.

या गुन्ह्यात जामीन मिळण्याकामी आरोपी नामे अफजल शमशुद्दीन शहा याने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत जामीन अर्ज केला तसेच जामीन अर्जावर ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीतर्फे बाजू मांडली. तसेच सरकारी वकील यांनी जामीन मिळूनये यासाठी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करता न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. आनंदकुमार चव्हाण, ॲड. अफरोज जहागीरदार, ऋषिकेश पाटील, आशुतोष गडदे यांनी मदत केली.