Pune RTO News | भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी, आता रिक्षाचालकांवर होणार कारवाई; 65 रिक्षाचालकांना नोटीसा

पुणे : Pune RTO News | रिक्षा चालकांविरोधातील तक्रारीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारींवरून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. यातील सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारल्याच्या आहेत. तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटीसा काढल्या आहेत.
शहरात रिक्षाने प्रवास करताना रिक्षा चालकांचा उद्धटपणाचा अनुभव येत असतो. त्याबाबत आरटीओ मध्ये जाऊन किंवा ईमेल द्वारे तक्रारी करणे शक्य आहे, मात्र ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हाट्सअप क्रमांक सुरु केला. या क्रमांकावर गेल्या काही महिन्यात रिक्षाचालकांच्या १३५ तक्रारी आल्या आहेत.
त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गैरवर्तनाच्या तक्रारी या भाडे नाकारल्याचे असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले म्हणाले, “हेल्पलाइनवरून रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्याची सोय आरटीओने दिली आहे. त्यावर काही तक्रारी येत आहेत. तसेच, रिक्षाचालकांबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आरटीओकडून रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये तपासणी करून सर्व प्रकारची कारवाई केली जाणार आहे.”