Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातून महिला वकिलासमोर लॉजमध्ये एकाने केली आत्महत्या; पुणे स्टेशनसमोरील होमलँड लॉजमध्ये धक्कादायक घटना

Suicide-Case

पुणे : Pune Crime News | पत्नीला सोडून माझ्याबरोबर रहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करुन दे आणि ३० लाख रुपयांची परतफेड कर अथवा सुस येथील फ्लॅट नावावर कर, या कारणावरुन अनैतिक संबंधातून एका महिला वकिलाने आपल्यासमोर लॉजमध्ये एकाला आत्महत्या करायला भाग पाडले.

अंकुश डांगे (वय ४५, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांकडे (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माढा (Madha) तालुक्यातील ४२ वर्षाच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे स्टेशनसमोरील होमलॅन्ड लॉजमध्ये (Hotel HomeLand Pune) ९ जानेवारी २०२५ रोजी घडली. अंकुश डांगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़. तेव्हा ही महिला वकिल तेथे उपस्थित होती. या महिला वकिलांचे पती न्यायाधीश असून त्यांना यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधांची कल्पना होती, असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होता. आरोपी महिला वकिल व अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली. त्यातून मैत्री व प्रेमसंबंध निर्माण झाले. ही आरोपी डांगे यांना तू पत्नी व मुलीला सोडून देऊन माझ्याबरोबर रहा अन्यथा आत्महत्या कर, असे म्हणत होती. डांगे यांचा मुलगा व आरोपींची मुलगी यांचे लग्न लावून दे. तसेच फिर्यादीचे बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट व मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करण्याकरीता डांगे याने तिच्याकडून ३० लाख रुपये घेतले होते. हे पैसे परत कर नाही तर सुस येथे असलेला फ्लॅट माझ्या नावावर कर, असे सांगून ती डांगे यांना मानसिक त्रास देत होती. आरोपी महिला वकिलाने ९ जानेवारी रोजी अंकुश डांगे यांना होमलँड लॉजमध्ये बोलावून घेतले.पत्नी व मुलीला सोडून दे व माझ्याबरोबर रहा, नाहीतर आत्महत्या कर, असे तिने अंकुश डांगे याला सांगितले. तेव्हा अंकुश डांगे यांनी तिच्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण (PSI Ganesh Chavan) तपास करीत आहेत.